प्रेमसंबंधास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजस्थानातील एका तरुणाच्या विरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून; कोंढव्यातील घटना

याबाबत अल्पवयीन मुलीच्या २२ वर्षीय बहिणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी नातेसंबंधातील आहेत. आरोपी तरुण राजस्थानातील आहे. तो अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिल्याने तो चिडला होता. राजस्थानातून तो पुण्यात येऊन मुलीला त्रास देत होता. शिकवणी वर्गाला निघालेल्या मुलीच्या पाठलाग करुन त्याने तिला त्रास दिला होता.

हेही वाचा- मराठी साहित्यविश्वात नव्या दमाची ऊर्जा; पुस्तक प्रकाशन, विक्री, वितरणात तरुणांचा पुढाकार

अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिल्यानंतर तो चिडला. त्याने मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती बहिणीला दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक सपना वाघमारे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl who refuses love is threatened with throwing acid by a young man pune print news rbk 25 dpj