एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान | 'Abhaya' campaign for the honor of single women vanchit vikas sanstha pune | Loksatta

एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान

मीना कुर्लेकर म्हणाल्या, एकल महिलांचा उल्लेख करताना बोलताना अनेकदा असे शब्द सहज वापरतो. मात्र, तिच्या मनावर होणाऱ्या आघातांचा आपण विचार करत नाही.

एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान
एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान

पुणे : विधवा, परित्यक्ता, एकटी बाई, घटस्फोटित, नवरा सोडलेली, नवऱ्याने टाकलेली, बिना लग्नाची असे शब्द वापरून आपण एकल महिलांचा अपमान करतो. अशा शब्दांचा त्या व्यक्तीवर सखोल परिणाम होत असतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेच्या वतीने या महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान हाती घेतले आहे. वंचित संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेच्या संचालिका सुनीता जोगळेकर आणि मीनाक्षी नवले या वेळी उपस्थित होत्या.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, एकल महिलांचा उल्लेख करताना बोलताना अनेकदा असे शब्द सहज वापरतो. मात्र, तिच्या मनावर होणाऱ्या आघातांचा आपण विचार करत नाही. संघर्षमय परिस्थितीचा सामना करत निर्भयपणे उभी राहणारी स्त्री म्हणजे अभया असते. तेव्हा संघर्ष वाट्याला आलेल्या अशा स्त्रियांना आपण अभया म्हणायला हवे. “या अभियानांतर्गत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा सर्वांना निवेदने देण्यात येणार आहेत. या स्त्रियांसाठी अभया शब्दाचा वापर करण्याचा आग्रह केला जाणार आहे, असेही  कुर्लेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : चंद्रकात पाटील म्हणतात गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला….

अपंगांसाठी दिव्यांग, मतिमंद यासह प्राण्यांच्या बाबतीत श्वान, वराह असे सन्मानजनक शब्द आपण वापरतो आहोत. मग स्त्रियांच्या बाबतीत भाषिक संवेदनशीलता दाखवायला हवी की नको, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच विचार घेऊन आम्ही समाजातील या महिलांच्या सन्मानासाठी हे अभियान राबवत आहोत. – मीना कुर्लेकर, कार्यवाह, वंचित विकास संस्था

हेही वाचा : रस्ते काँक्रिटीकरण वृक्षांच्या मुळावर; झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ

‘अभया’साठी संवाद सुविधा

खूपदा अशा महिलांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. मात्र, कोणाशी बोलावे हे समजत नाही. यासाठी संस्थेच्या वतीने ‘अभया-मनातली’ ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना हा मुक्तसंवाद करायचा असेल त्यांनी ९३७०८२५३६८ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा पूर्णपणे मोफत आणि गोपनीय आहे, असे सुनीता जोगळेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मद्यपी मुलाकडून आईवर चाकूने हल्ला ; लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीमधील घटना

संबंधित बातम्या

‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
स्वप्निलने MPSC ला का म्हटलं मायाजाल?; वाचा आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र
Video : मद्यधुंद अवस्थेत तरुणीने पुण्यातील हिराबाग चौकात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन घातला धिंगाणा
Video : गोष्ट पुण्याची – नानासाहेब पेशव्यांनी विस्तार केलेला शनिवार वाडा!
‘नवहिंदू ओवैसी’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले “अशा लवंड्यांना..”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर