मागील काही महिन्यापासून केंद्र सरकार मार्फत सतत पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यावर सत्ताधारी भाजपकडून कोणताही नेता भूमिका मांडत नाही. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे दौर्यावर आले असतांना महागाईबाबतची भूमिका स्पष्ट करत एक प्रकारे पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ” वाढत्या महागाईच एक कारण म्हणजे भ्रष्टाचार असून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि अधिकारी जे पैसे लुटण्याच काम करतात, तो पैसा तेथूनच येत आहे” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> पुणे : “उद्धव ठाकरेंच्या ३३ गुंडावर…” ‘त्या’ हल्ल्याचा उल्लेख करत किरीट सोमय्यांचं सूचक विधान
“पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढी सांगायचे झाल्यास यूक्रेन युद्धाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य नियोजन करून रशियासोबत करार केला. त्यावेळी पाकिस्तान, श्रीलंका या देशात प्रचंड भाववाढ झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया सोबत करार केल्यामुळेच आपल्याकडे भाववाढ नियंत्रणात ठेवू शकलो” असं सांगत वाढत्या महागाई बाबत केंद्र सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
हेही वाचा >>> पुणे : “संजय राऊत म्हणत होते, ते हेच दंगे….”, किरीट सोमय्यांचं पुण्यातून टीकास्र
कोणाचाही तपास किंवा चौकशी बंद झाली नाही
किरीट सोमय्या खासदार भावना गवळी शिंदे गटात आल्यावर ईडी मार्फत सुरू असलेली चौकशी बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, ही बाब न्याय प्रविष्ट असून त्यावर बोलण उचित नाही. पण कोणाचीही चौकशी किंवा तपास बंद झाला नाही. तपास हा यंत्रणा मार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.