पुण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी छापे टाकण्यात आले.कल्याणीनगर भागात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. बांधकाम कंपनीच्या कार्यालयावर ईडीच्या पथकाने शुक्रवारी छापे टाकले. कार्यालयातून ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतली. ईडीच्या पथकाकडून बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हडपसर परिसरातील महंमदवाडी भागात बांधकाम व्यावसायिकाकडून बांधण्यात आलेल्या सोसायटीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पिंपरी: हिंजवडीत सराईत गुन्हेगार निलेश गायवळचे फलक; गुन्हा दाखल

ईडीच्या मुंबई पथकाने ही कारवाई केली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. सायंकाळपर्यंत बांधकाम व्यावसायिकाची चौकशी सुरू होती. बांधकाम व्यावसायिकाने पुण्यात येरवडा, कल्याणीनगर, एनआयबीएम रस्ता, वानवडी आदी भागात मोठे गृहप्रकल्प साकारले आहेत.

हेही वाचा >>>पुणे: एक दशकापासून कागदावरच राहिलेल्या रस्त्यासाठी स्थानिक रहिवाशांची मुंबई उच्च न्यायालयात धाव !

दरम्यान, १० मार्च रोजी ईडीकडून पुण्यातील रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना अटक करण्यात आली. काॅसमाॅस बँकेची २० काेटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आरहाना यांना अटक करण्यात आली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने आरहाना यांना २० मार्चपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed raids the office of a builder in pune rbk 25 amy