भवानी पेठेत रविवारी सायंकाळी अचानक  स्फोटाचा अवाज झाल्याने पोलिसांची धांदल उडाली. समर्थ पोलिस, गुन्हे शाखेचे पोलिस, तसेच इतर तपास यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाल्याचे तपासनंतर दिसून आले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती वॉशिंग मशीन दुरूस्तीचे काम करत असताना ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. यावेळी खिडकीच्या काचा फुटल्या. मात्र या अपघातात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली, त्यावेळी वॉशिंग मशीनचे काम करताना हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांसह विविध पथकांच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाहणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारे घातपाताचे किंवा संशयास्पद कृत्य आढळले नसल्याचे समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosion at house in pune while washing machine repairing work rumors frightened people pune print asj