कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अल्पसंख्यांक समाजातील महिला आणि युवक, ‘सारथी’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमास प्रवेशासाठी १८ ते ४० वर्षे वयोमर्यादा, किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, प्रत्येक अभ्यासक्रमासाठी तीस जागा आहेत.
हेही वाचा >>>पुणे: कर्वे रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचार्यांचे मोबाइल चोरले
अल्पसंख्यांक समाजातील, सारथी अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू न शकलेले बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य अभ्यासक्रमांचा लाभ घेता येईल. सुरुवातीला अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, फील्ड टेक्निशियन- एसी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सारथीअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सध्या सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>पुणे: उद्धव ठाकरे चूक सुधारत असतील तर आनंदच; चंद्रकांत पाटील यांची भूमिका
किमान तीन महिन्याचा हा अभ्यासक्रम असणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी मुलींना प्राधान्य आहे. प्रवेशासाठी गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रवेशासाठी https://forms.gle/m7jZocco3RFcmBav5 या दुव्याचा वापर करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी ९८५०१५१८२५ ९४२१७६६४५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले