पुणे : हडपसर परिसरात २५ लाखांचा गुटखा जप्त ; एकास अटक

बंदी घातलेल्या गुटख्याची बेकायदा विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हडपसर परिसरात पकडले.

seized gutkha
( प्रतिनिधिक छायाचित्र )

खंडणी विरोधी पथकाची कारवाई

बंदी घातलेल्या गुटख्याची बेकायदा विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हडपसर परिसरात पकडले. पोलिसांनी २५ लाखांचा गुटखा तसेच मोटार जप्त केली.

प्रकाश प्रेमाराम भाटी (वय ३३, रा. समर्थ कान्हा सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसर परिसरात एकजण मोटारीतून गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हडपसर परिसरात सापळा लावला. पोलिसांनी संशयित मोटार अडवली. मोटारीची पाहणी केली. तेव्हा मोटारीत गुटखा ठेवलेल्या पिशव्या सापडल्या. मोटारीतून जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत २५ लाख रुपये आहे. भाटी मुंढवा परिसरातील पानपट्टी चालकांना गुटखा विक्री करत असल्याची माहिती चौकशीत मिळाली.

सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगने, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, चेतन शिरोळकर, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंखे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gutka worth rs 25 lakh seized in hadapsar pune print news amy

Next Story
पुणे : जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव भक्तिभावामध्ये
फोटो गॅलरी