पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६७ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ९१ मि.मी, पानशेत धरण परिसरात ९२ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ४.५१ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १५.४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी रात्री चारही धरणांत ४.०८ टीएमसी पाणीसाठा होता. बुधवारी रात्रीच्या तुलनेत गुरुवारी सकाळी ०.४३ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in pune dam area pune print news msr