लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: घरातील कोयता शेजाऱ्याला देण्याच्या वादातून दाम्पत्याने परस्परांना मारहाण केल्याची घटना मार्केटयार्ड ‌भागात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित दाम्पत्य मार्केट यार्ड भागातील एका सोसायटीत राहायला आहे. सोसायटीत राहणाऱ्या एका रहिवाशाने ‌झाडे कापण्यासाठी कोयता किंवा कात्री आहे का? अशी विचारणा केली. कोयता देण्यावरुन दाम्पत्यात वाद ‌झाला. या वादातून दोघांनी एकमेकांना मारहाण केली, तसेच कोयत्याने हल्ला केला, असे दाम्पत्याने एकमेकांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मार्केटयार्ड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband and wife beat each other for giving koyta to neighbour pune print news rbk 25 mrj