चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याच चिठ्ठीत नमूद; आयुष्य संपविणार असल्याचं देखील म्हटलंय

पिंपरी-चिंचवडमध्ये तलाठी पतीने डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात हातोडा आणि चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरला साळवे असे खून झालेल्या डॉक्टर महिलेचे नाव असून विजयकुमार साळवे असे फरार तलाठी आरोपीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयकुमार याने फरार होण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून पत्नी सरला चा खून चारित्र्याच्या संशयावरून केल्याचं त्यात म्हटलं आहे. तसेच, मी माझं आयुष्य संपवत आहे असा उल्लेख चिठ्ठीमध्ये असून आरोपी विजयकुमार फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडिसी पोलीस ठाण्याच्या परिसरात साळवे कुटुंब राहत. विजयकुमार हा जुन्नर तालुक्यात तलाठी पदावर कार्यरत असून मयत सरला या पुण्यात शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. या दोघांचा दोन वर्षांपूवी प्रेम विवाह झालेला आहे. दोघे ही भंडारा आणि गोंदिया येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान, विजयकुमार हा पत्नी सरला हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. शनिवारी त्यांच्या घरी पूजा होती. त्याच रात्री सरला झोपेत असताना पती विजयकुमार ने तिच्या डोक्यात हातोड्याचा जोरदार प्रहार केला शिवाय चाकूने देखील वार केले असल्याचं समोर आलं आहे. ही घटना सोमवारी सकाळी समोर आली असून एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, उच्चशिक्षित तरुण तरुणी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love marriage doctor murders wife husband escapes crime ssh 93 kjp