पुणे : गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती कार्यशाळा | Natural Farming Workshop in presence of Gujarat Governor Devvrat pune print news amy 95 | Loksatta

पुणे : गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती कार्यशाळा

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती कार्यशाळा
गुजरात राज्यपाल आचार्य देवव्रत ( फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस )

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सहा ऑक्टोबर रोजी बालेवाडी क्रीडा संंकुलात होणार आहे. कार्यशाळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यात २८ जणांना नव्याने करोना संसर्ग

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हरियानातील कुरुक्षेत्र येथील गुरुकुलात सुमारे दोनशे एकर जागेत नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले आहेत. भविष्यात नैसर्गिक शेती हाच शाश्वत शेतीचा पर्याय कसा होऊ शकतो, या बद्दल राज्यपाल मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला राज्यभरातून दोन हजार शेतकरी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्यूब वाहिनीवर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सोय ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी संशोधन संस्थांमधून केले जाणार आहे. कार्यशाळेत नैसर्गिक शेती, जैविक शेती, सेंद्रिय आणि रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे विद्यापीठातील शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे ; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची भूमिका

संबंधित बातम्या

शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”
शहराचा विकास आराखडा राज्य शासनाला सादर
तज्ज्ञांकडून यशाचा कानमंत्र मिळवण्याची संधी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य
Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी
शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
India Bangladesh 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध सपशेल अपयशाची नामुष्की टाळण्याचे भारताचे लक्ष्य!