शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांविषयी मला माहिती नाही. पण, यासंदर्भात मी काय बोलणार?, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपा पराभूत होणार, हे अमित शाहांनी हेरलं”, रोहित पवारांचा टोला!

पक्षचिन्ह जाणार म्हणून शिवसेनेने पक्षाचा निधी दुसरीकडे वळविला, याकडे लक्ष वेधले असता अजित पवार यांनी ‘तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे’, असे उत्तर दिले. महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत. पण, प्रत्येक पक्ष आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत असतो. निधी वळविला गेला असला तरी या संदर्भात मला माहिती नाही. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. याबाबत मी काही बोलू इच्छित नाही, असे पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader ajit pawars reaction to shivsena leader sanjay rauts allegations against the election commission pune print news vvk 19 dpj