पुणे : एका ८६ वर्षीय वृद्धाला मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. त्याला छातीत तीव्र दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीत त्याच्या डाव्या मुख्य धमनीत गुठळी होऊन ती ९० टक्के बंद झाल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी त्यांच्या धमन्यांवर कॅल्शियमचा थरही आढळून आला. या रुग्णावर अत्याधुनिक ऑरबिटो-ट्रिप्सी पद्धतीने डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने ही ऑरबिटो-ट्रिप्सी प्रक्रिया करण्यात आली. रुग्णाचे जास्त वय आणि कॅल्शियमच्या प्रमाणामुळे त्याच्या पारंपरिक उपचार करणे कठीण होते. त्यामुळे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अन्नपूर्णा कालिया यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने ऑरबिटल अॅथरेक्टोमी आणि शॉकवेव्ह इन्ट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी या दोन अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून उपचार केले. यात प्रथम ओरबिटल अॅथरेक्टोमीने धमन्यांच्या भिंतीवरील कॅल्शियमचे कठोर थर काढून टाकण्यात आले. शॉकवेव्ह थेरपीने अधिक खोल असलेल्या कॅल्शियमच्या थरांवर उपचार करण्यात आले. ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कॅल्शियमच्या स्थितीचे आणि जाडीचे अचूक परीक्षण करून योग्य उपचार करण्यात मदत झाली. त्यानंतर रुग्णाच्या धमनीत स्टेंट बसविण्यात आले.

हेही वाचा >>>हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट; चोरट्यांच्या मारहाणीत तरुण जखमी

याबाबत डॉ. अन्नपूर्णा कालिया म्हणाल्या की, अत्याधुनिक तंत्रज्ञान जास्त जोखीम असलेल्या रुग्णांसाठी आदर्श आहेत. कारण ते पारंपरिक बायपास शस्त्रक्रिया न करता सुरक्षित आणि प्रभावी उपचारांचा पर्याय देतात. कॅल्शियम काढल्यानंतर स्टेंट बसवण्यात आल्याने भविष्यात रक्तवाहिन्यात अडथळे निर्माण होण्यापासून बचाव झाला. हा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर केवळ ३६ तासांत बरा होऊन घरी गेला.

प्रक्रिया नेमकी कशी…

रुग्णाच्या धमनीच्या भिंतीवरील कॅल्शियमच्या कठीण थरांना घासून काढण्यात आले. त्यामुळे धमनी लवचिक होऊन स्टेंट बसवण्यासाठी तयार होते. या प्रक्रियेशिवाय स्टेंट व्यवस्थित बसू शकला नसता. या रुग्णाच्या धमन्यांमध्ये ९० टक्के अडथळा होता. त्यामुळे हृदयाच्या कार्यासाठी गंभीर धोका निर्माण झाला होता. कॅल्शियम काढल्यानंतर स्टेंट बसविल्यानंतर रक्त प्रवाह सुरळीत होण्यासोबत भविष्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यताही कमी झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orbito tripsy treatment of 86 year old man with heart problem was successful pune print news stj 05 amy