plaster of paris shade of the pune collectorate collapsed due to strong winds pune print news zws 70 | Loksatta

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘लौकिकाचे छप्पर फाटले’ ;  जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाचेही नुकसान

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ‘भव्यदिव्य’ अशा नूतन इमारतीचे उद्घाटन ७ ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘लौकिकाचे छप्पर फाटले’ ;  जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाचेही नुकसान
आच्छादन कोसळून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या गाडीची काचही फुटली.

पुणे : तब्बल ६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करून बांधलेल्या, मंत्रालयानंतरची सर्वांत सुसज्ज हरित इमारत असा लौकिक असलेल्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस – पीओपी’ आच्छादन शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे कोसळले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे वादळ, वारा, पाऊस, अतिउष्णता, हवा आदींवर आधारित पर्यावरणपूरक बांधकामाबाबतचा प्रशासनाचा दावा फोल ठरला. तसेच हे आच्छादन कोसळून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या गाडीची काचही फुटली. कार्यालयातील कागदपत्रे वाऱ्याने उडाली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ‘भव्यदिव्य’ अशा नूतन इमारतीचे उद्घाटन ७ ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या इमारतीसाठी तब्बल ६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लौकिकाचे छप्पर कोसळल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील छताचे पीओपी आच्छादन कोसळले. त्याचा फटका जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या शासकीय वाहनाला बसला. डॉ. देशमुख यांच्या चारचाकीची मागील काच आच्छादन कोसळून फुटली. सुदैवाने त्या वेळी गाडीत कोणीही नव्हते. तसेच वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेचे नायब तहसीलदार श्रावण ताते म्हणाले, की नायब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) आहे. शुक्रवारी झालेल्या प्रकाराबाबत तत्काळ पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून संबंधित बांधकाम आणि वादळी पावसाच्या उपाययोजना संदर्भातील काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

संबंधित बातम्या

“विक्रम गोखले तीन महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात आले होते, तेव्हा…”, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितली ‘ती’ आठवण!
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाला लवकरच मान्यता; जतमधील ६५ गावांना पाणी
वाहनचालकांना सूचना देण्यासाठी एलईडी फलक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
पालकांसाठी ‘बालभारती’ची उजळणी..