पुणे : गोळीबार मैदान चौकातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बुधवारपासून (२७ नोव्हेंबर) प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान चौक अरुंद आहे. या भागात वाहतूक कोंडी होते. कोंडी सोडविण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारपासून तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : थंडीचा जोर आणखी वाढणार? काय आहे हवामानतज्ज्ञांचा अंदाज?

सोलापूर रस्ता, तसेच पूलगेटकडून गोळीबार मैदान चौकातून डावीकडे वळून रक्षा लेखा नियंत्रक कार्यालय (सीडीओ) चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. सीडीओ कार्यालय चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी सोलापूर बाजार, नेपीयर रस्ता, खटाव बंगल्यामार्गे सीडीओ चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune golibar maidan traffic route changes due to traffic jam pune print news rbk 25 css