पुणे रेल्वेने एप्रिलमध्ये फुकट्या प्रवाशांवर विक्रमी दंडवसुलीची कारवाई केली होती. मात्र, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या आणि कारवाईचा वेगही वाढत असल्याने एप्रिलमधील हा विक्रम मे महिन्यात मोडीस निघाला आहे. रेल्वेने ३६ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून अडीच कोटींहून अधिकच्या दंडाची वसुली केली आहे. पुणे रेल्च्च्या कारवाईत कोणत्याही एका महिन्यात वसूल झालेला हा आजवरचा सर्वाधिक दंड ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे उपनगरीय गाड्यांसाठी विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. या कारवाईमध्ये विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड न भरल्यास तुरुंगवासाची कारवाईही केली जाते. मे महिन्यामध्ये ३६ हजार ३९० जणांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ कोटी ५० लाख ३९ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यामध्ये विनातिकीट प्रवाशांकडून २ कोटी ४७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. कोणत्याही एका महिन्यात वसूल झालेला हा सर्वाधिक दंड ठरला होता. मात्र, मे महिन्यातील दंडवसुलीचे एप्रिलचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

त्याखेरीज अनियमित प्रवासासाठी ८७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जवळील साहित्याचे बुकिंग न करणाऱ्या २८६ जणांना पकडून त्यांना ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे मे महिन्यात एकूण २ कोटी ५१ लाख १६ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयानुसार तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तिकीट तपासणी यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rly div collects rs 2 cr 50 fine from 36k ticketless travelers pune print news scsg