लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोराला रोखून तरुणीचे प्राण वाचविणारे लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. जखमी तरुणीला मुख्यमंत्री शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत दिली आहेत.

सारसबाग परिसरातील शिवसेना भवन कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते तरुणीचे प्राण वाचविणारे महाविद्यालयीन तरुण लेशपाल जवळगी, हर्षद पाटील, दिनेश मडावी यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले. आर्थिक मदतीचा तरुणांना शिक्षणासाठी उपयोग होईल. त्यांना पाठबळ मिळेल, असा संदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठविला आहे. आरोपीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. जखमी झालेल्या तरुणीच्या मित्राला शिवसेना शिंदे गटाकडून पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेचा खर्चही करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; शिरूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. एकतर्फी प्रेमातून तरुणींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्यात याव्यात. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. शहर प्रमुख प्रमोद तथा नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना सचिव किरण साळी, महिला आघाडी अध्यक्ष लिना पानसरे, पूजा रावेतकर, निलेश घारे, प्रमोद प्रभुणे आदी यावेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reward of 15 lakhs from the cm eknath shinde to the youth who saved the life of girl in sadashiv pethe pune print news rbk 25 mrj