पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या १५ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २४ फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. त्यानुसार ४०वी सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. उमेदवारांना २४ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे अर्ज भरता येणार आहे. तसेच, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १४ ते २१ मार्च अशी मुदत देण्यात आल्याचे विद्यापीठाच्या सेट विभागाने नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रत स्वत:कडे जतन करून ठेवावी. ही प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभागाकडे पाठवू नये. प्रवेशअर्ज आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. त्यानुसार परीक्षेचे शुल्क भरलेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल,’ अशी माहिती विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डाॅ. ज्योती भाकरे यांनी दिली. दरम्यान, उमेदवार एखाद्या विषयात या पूर्वीच सेट परीक्षा पात्र ठरला असल्यास संबंधित उमेदवाराला त्याच विषयासाठी पुन्हा परीक्षा देता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.D

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university set exam application forms last date know all the details pune print news ccp 14 css