एक चित्र हजारो शब्दांपेक्षा प्रभावी असते. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी चित्रांचा वापर करून त्यातून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम कोथरुड कर्वेनगर येथील एका सोसायटीने केला आहे. ही चित्रे डिझायनर शंतनू विश्वास आणि त्यांची सहकारी शेजल दांड यांनी रेखाटली आहेत. नवसह्य़ाद्री सोसायटीच्या भिंतींवर सामाजिक, प्रबोधनपर अनेक चित्रे रेखाटण्यात आली असून ही चित्रे चर्चेची ठरली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोसायटीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सोसायटीच्या िभती केवळ रंगविण्यापेक्षा काही वेगळे करता येईल, असा विचार करीत असताना चित्रे रेखाटण्याबाबत विचारविनिमय झाला. मात्र, चित्रांमधून ठोस संदेश हवा, असे ठरवून शंतनू विश्वास यांच्याशी संपर्क करण्यात आला. ते मूळचे कोलकात्याचे आहेत. शंतनू यांनी काही चित्रे दाखविली.

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ती पसंत पडली आणि पुढील प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला चित्रे साकारल्यानंतर भिंती खराब

होण्याचा धोका होता. मात्र, चित्रेच अशी रेखाटण्यात आली आहेत की, कोणताही विवेकी माणूस ती खराब करण्यास धजावणार नाही, अशी त्या चित्रांची ताकद आहे.

सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त समाजाला काही देण्याच्या विचारातूनच हा उपक्रम करण्यात आला आहे. ही भिंत ७०० फूट लांब, सात फूट उंच आहे.

या चित्रांमध्ये पर्यावरण, सामाजिक सलोखा, स्मार्ट सिटी, ऐतिहासिक वास्तू, लष्करातील जवान आदी विषय आहेत. शेजल दांड सध्या मुंबई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून ती छंद म्हणून चित्रे काढते. तर शंतनू हे व्यवसायाने डिझायनर आहेत.

चित्रांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. भिंती खराब होऊ नये या हेतूनेच सोसायटीने संपर्क साधला होता. चित्रांमधील कल्पना माझ्या असून प्रत्यक्ष चित्रे शेजल दांड हिने रेखाटली आहेत. भिंतींवर चित्रे काढल्याने जाता-येता लोक ती चित्रे पाहतात. लोकांना यातून सामाजिक संदेश मिळतो. या आधीही अनेक ठिकाणी मी असे प्रकल्प केले आहेत. मात्र, पुण्यात एखाद्या सोसायटीकडून पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भिंतीवरील चित्रे पहिल्यांदाच रेखाटण्यात आली आहेत.

– शंतनू विश्वास

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social message from wall painting