सर्व काही उत्तम सुरू असल्याच्या आभासावर विश्वास ठेवणारे अनंत असल्यास ते तसे नाही, हे लक्षात घेणाऱ्या मूठभरांची फिकीर करण्याचे सरकारला कारणच काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वाधिक आकर्षक विनाहिशेब उत्पन्न, मोफत प्रवास, जेमतेम पाच वर्षे सेवेवर तहहयात निवृत्तिवेतन आदी सोयी-सवलती देणारे राजकारण हे एकच सांप्रत समयी सर्वात आकर्षक रोजगारनिर्मिती क्षेत्र असावे. असे म्हणायचे याचे कारण अन्य क्षेत्रातील रोजगार संधींचा वेगाने घसरता आलेख. याबाबतचा प्रसिद्ध झालेला तपशील धक्कादायक आहे. करोनाची चौथी लाट नाही आणि अन्य काही नैसर्गिक संकट नाही. पण तरी आपल्याकडे बेरोजगारांसाठी रोजगार संधी काही वाढायला तयार नाहीत. उलट आहेत त्याही कमी होताना दिसतात. या घसरगुंडीबाबत रोजगार संधींची स्पर्धा आपल्या रुपयाशी सुरू असावी; असे दिसते. अलीकडे तर एक दिवस असा जात नाही की ज्या दिवशी रुपयाचे मूल्य नवनवे नीचांक प्रस्थापित करीत नाही. त्यात या घसरत्या रोजगार संधींच्या जोडीने सरत्या महिन्यात आपल्या देशाची आयातही मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. या आयातीच्या बरोबरीने निर्यातवृद्धीही होताना दिसली असती तर आनंद होता. पण तसे नाही. आयातीची फक्त गती आणि निर्यातीची अधोगती असे आपल्या अर्थव्यवस्थेचे चित्र जून महिन्यातही दिसले. निर्यातीच्या तुलनेत आयात अधिक झाली तर चालू खात्यातील तूट (करंट अकौंट डेफिसिट) मोठय़ा प्रमाणावर वाढते. म्हणजे निर्यातीतून पुरेसे डॉलर मिळत नसताना आयातीच्या खर्चापोटी अधिक डॉलर मोजावे लागतात ही परिस्थिती. असे दीर्घकाळ होत राहिले तर परकीय चलनाची गंगाजळीही आटू लागते. तो धोका अद्याप दूर आहे. पण संकटाची पूर्वकल्पना असेल तर शहाणे त्यास सामोरे जाण्यास सज्ज असतात. म्हणून या दुहेरी आव्हानांची दखल.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployment crisis in india job opportunities declining in india zws
First published on: 06-07-2022 at 03:24 IST