कार्तिक आर्यनबरोबरच्या ‘त्या’ वादावर करण जोहरची प्रतिक्रिया
करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यात २०२१ मध्ये 'दोस्ताना २' चित्रपटावरून वाद झाला होता. मात्र, २०२४ मध्ये त्यांनी 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाची घोषणा केली. समीर विद्वंस दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. करणने सांगितले की, त्यांनी वाद मिटवून एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. 'नागझिला' आणि अनुराग बासूंच्या आगामी चित्रपटातही कार्तिक झळकणार आहे.