मधुबाला आई होऊ शकत नसल्याने दिलीप कुमार यांनी नातं तोडलं, दिग्गज अभिनेत्रीचा दावा
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी मधुबाला व दिलीप कुमार यांच्या नात्याबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे. मुमताज म्हणाल्या की मधुबाला दिलीप कुमार यांच्या प्रेमात वेडी होती, पण तिला मूल होऊ शकत नसल्याने दिलीप कुमार यांनी तिच्याशी संबंध तोडले. त्यांनी नंतर सायरा बानूशी लग्न केलं. मधुबालाने नंतर किशोर कुमारशी लग्न केलं, पण ते नातंही संपलं. १९६९ साली मधुबालाचं निधन झालं.