भाजपा जवळीक साधू इच्छिणारा ‘हा’ मुस्लीम समुदाय ओबीसीमध्ये गणला जाणार?
केंद्र सरकारने जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पसमंदा मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या नेत्यांनी याला दुजोरा दिला असून, पसमंदा मुस्लिमांना त्यांचा योग्य वाटा मिळेल, असे म्हटले आहे. पसमंदा मुस्लिम म्हणजे मागासलेले मुस्लिम, ज्यांची संख्या ८०-८५ टक्के असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे भाजपाला पसमंदा मुस्लिमांचे समर्थन मिळवण्याची आशा आहे.