‘धर्मांतर, बलात्कार आणि…’; पाकिस्तानात हिंदूंवर कसे अत्याचार होत आहेत? ‘हा’ अहवाल समोर
अमेरिकेच्या 2023 आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि भेदभाव होत असल्याचे नमूद केले आहे. हिंदू, ख्रिश्चन, शीख यांच्यासाठी पाकिस्तान अत्यंत धोकादायक आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि निकाह लावले जातात. हिंदू मंदिरांवर हल्ले आणि अतिक्रमण होत आहे. जातीय भेदभाव आणि अल्पसंख्यांक महिलांना निवडणुकीत विरोध यासारख्या समस्यांचा उल्लेख अहवालात आहे.