कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या कुंवर विजय शाह यांच्यावर गुन्हा
भाजपाचे मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांनी भारतीय सैन्य दलाच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाह यांनी सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण संबोधल्याने न्यायालयाने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. काँग्रेसनेही त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. न्यायालयाने शाह यांच्या विधानाला देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी धोकादायक मानले आहे.