Video: “पाकिस्तानने काही करण्याची हिंमत केली, तर त्यांना चांगलंच माहितीये की…”, डीजीएमओ…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानने शस्त्रविरामाचा प्रस्ताव दिला, परंतु पुन्हा हल्ला केला. भारतीय नौदलाचे डीजीएमओ व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. ७ ते १० मे दरम्यानच्या कारवायांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तिन्ही सैन्यदलांचे डीजीएमओ उपस्थित होते. पाकिस्तानने पुन्हा आगळीक केल्यास युद्धाची कृती मानली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.