१५ दिवसांपूर्वी दुकान उघडले, पण घटनेच्या दिवशी ठेवले बंद; ‘तो’ दुकानदार NIA च्या रडारवर
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी दुकान बंद ठेवणाऱ्या दुकानदाराची कृती संशयास्पद आढळल्याने तपास यंत्रणांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) २६ जणांच्या मृत्यूच्या घटनेची चौकशी करत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांची चौकशी झाली आहे. भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असून, भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत.