Charminar Fire: हैदराबादच्या चारमिनार येथे भीषण आग; १७ जणांचा मृत्यू
हैदराबादच्या चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस या इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली, ज्यात १७ जणांचा मृत्यू झाला. दागिन्यांच्या दुकानात आग लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली.