‘… तर पत्नीला पोटगी मिळवण्याचा अधिकार नाही’, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा मोठा निकाल
छत्तीसगड उच्च न्यायालयाने पोटगीच्या प्रकरणात पतीच्या बाजूने निकाल दिला. एका महिलेने पतीकडून दरमहा २०,००० रुपये पोटगीची मागणी केली होती, कौटुंबिक न्यायालयाने तिला दरमहा ४,००० रुपये मंजूर केले होते. पतीने पत्नीवर व्याभिचाराचे आरोप केले होते, जे सिद्ध झाले.