Bank Holidays : मे महिन्यात बँका किती दिवस राहणार बंद? वाचा, सुट्यांची संपूर्ण यादी
Bank Holidays List May 2025 : मे महिन्यात शाळा, कॉलेजला सुट्या असल्याने अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशा वेळी सुट्यांचे नियोजन पाहतात. तर काही जण आर्थिक नियोजनात गुंतलेले असतात. त्यांना बँकेसंबंधित महत्त्वाची कामं करायची असतात. जर तुमचेही मे महिन्यात बँकेसंबंधित काही महत्त्वाचे काम असेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण- मे महिन्यामध्ये देशभरातील बँका एकूण १२ दिवस बंद राहतील. त्यामध्ये राष्ट्रीय सुट्या, प्रादेशिक सण आणि दुसरा-चौथा शनिवार व रविवार या नेहमीच्या आठवड्याच्या सुट्यांचाही समावेश असेल.