“सीएसकेच्या पराभवाला मी कारणीभूत..”, बंगळुरूकडून पराभव झाल्यानंतर धोनीनं काय म्हटलं?
बंगळुरूमधील चिन्नास्वामी मैदानात आरसीबीने सीएसकेचा दोन धावांनी पराभव केला. या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवले. सीएसकेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने पराभवासाठी स्वतःला जबाबदार ठरविले. आयुष म्हात्रे आणि रवींद्र जडेजाच्या खेळीमुळे सीएसकेचा संघ मजबूत स्थितीत होता, पण अखेरच्या षटकात धोनीला आपली विकेट गमवावी लागली. धोनीने फलंदाजांच्या मर्यादांवरही बोट ठेवले.