“दुसऱ्याचा अपमान करणं…”, सध्याच्या कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीची स्पष्ट भूमिका; म्हणाली…
मराठी अभिनेत्री अनुजा साठेने स्टँडअप कॉमेडीवरील वादांवर तिचं मत व्यक्त केलं आहे. तिच्या मते, दुसऱ्यावर विनोद करणं म्हणजे कॉमेडी नाही. कपिल शर्माच्या शोचं उदाहरण देत, ती म्हणाली की, निखळ आणि प्रसंगनिष्ठ विनोदच खरे विनोदी असतात. अनुजा साठेने मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये तसेच वेबसीरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 