Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या सिनेमाने चौथ्या दिवशी किती लाख कमावले? वाचा…
'झापुक झुपूक' या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत अनुक्रमे २४, २४, १९ आणि १४ लाख रुपये कमावले आहेत. एकूण ८१ लाख रुपयांची कमाई झाली आहे, परंतु अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने फार चांगली कमाई केलेली नाही.