फरार असून पुण्यातील ‘वॉन्टेड नक्षलवादी’ यूट्यूबवरील शैक्षणिक लघुपटात ‘हिरो’ म्हणून झळकला
पंधरा वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला पुण्यात अटक करण्यात आली. तो 'उलगुलान - एव्हरीडे हिरो' या लघुपटात सुनील जगताप नावाने दिसला होता. खालापूरमध्ये तो आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक काम करत होता. त्याने बनावट नावाने आधार कार्ड, पासपोर्ट मिळवले होते. माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेच्या आदेशानुसार तो नक्षलवादी काम करीत होता. कोर्टाने त्याची पोलीस कोठडी १९ मेपर्यंत वाढवली आहे.