5G service to start in India | Loksatta

आजपासून 5G सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांसह १३ शहरांत मिळणार 5G चं सुपरफास्ट नेटवर्क; पाहा यादी

आता 5G सेवा लवकच नागरिकांना उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 5G सेवेला सुरुवात होणार आहे. ही सेवा पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील दोन शहरांसह देशातील १३ शहरांमध्ये मिळणार.

आजपासून 5G सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांसह १३ शहरांत मिळणार 5G चं सुपरफास्ट नेटवर्क; पाहा यादी
महाराष्ट्रातील दोन शहरांसह देशातील १३ शहरांतही 5G चं सुपरफास्ट नेटवर्क मिळणार. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

भारताने 5G च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. 5G ची प्रतीक्षा आता संपणार आहे. अवघ्या काही वेळात, 4G वरून अपग्रेड केल्यानंतर, आपण 5G सेवेपर्यंत पोहोचू. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या द इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये शनिवार, १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 5G सेवेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील दोन शहरांसह देशातील १३ शहरांतही 5G चं सुपरफास्ट नेटवर्क मिळणार आहे.

युजर्सला मिळणार ‘हे’ फायदे 

5G सेवा सुरू केल्यानंतर, युजर्सचा अनुभव खूप बदलणार आहे. जसे 4G ने युजर्सचे जग क्षणार्धात बदलून टाकले होते. त्याचप्रमाणे 5G आल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. इंटरनेट स्पीड दहा पट वाढवण्याचा सर्वात मोठा फायदा होईल. याचा फायदा असा होईल की बफरिंगपासून सुटका होईल. याशिवाय व्हॉट्सअॅप कॉलमधील व्यत्ययही संपणार आहे. चित्रपट १०-१५ सेकंदात डाउनलोड होईल. व्हर्च्युअल रियल्टी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवेल. गेमिंग जग बदलेल. तसेच दुर्गम भागात शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सेवा पोहोचणे सोपे होणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात ड्रोन आदींचा वापर करणे सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे Metaverse सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात होईल.

आणखी वाचा : ‘Jio Phone 5G’ : किंमत झाली लीक; आणखी जाणून घ्या बरंच काही…  

महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांचा समावेश

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या टप्प्यात दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, बंगळुरू, कोलकाता, चंदीगड, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, गांधी नगरसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, या दोन शहरांतील लोकांनाही सर्वात आधी या 5G सुविधेचा लाभ मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी टेलिग्रामची गरज नाही; व्हॉटसअ‍ॅपवरून करता येणार शेअर

संबंधित बातम्या

‘VI’ने लाँच केला नवीन वार्षिक प्लान, अमर्यादित कॉलिंगसह मिळणार ८५० जीबी BULK DATA, जाणून घ्या इतर लाभ
आता मनसोक्त लिहा, फोटो काढा, सॅमसंगच्या ‘या’ 5 G फोनवर मिळत आहे ३२ हजारांची मोठी सूट, हे केल्यास अजून बचत होईल
तक्रारी काही संपेना; आता ‘या’ समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅपल लाँच करणार १६.१.१ अपडेट
१ डिसेंबरला सादर होणार XIAOMI 13 SERIES; 120 W फास्ट चार्जिंगसह मिळू शकतात ‘हे’ खास फीचर्स
विश्लेषण: हॅकर्स तुमच्या ब्लूटूथ उपकरणांद्वारे डेटा कसा चोरतात? ‘ब्लूबगिंग’ हॅकिंग तंत्र नेमकं आहे तरी काय?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये ३ पिस्तुलं, ११ जिवंत काडतुसे, ६ कोयते जप्त; सात जणांना ठोकल्या बेड्या
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा