सध्या देशभरात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. सकाळी १० च्या नंतर रस्त्यावर चालताना सुद्धा उन्हाच्या झळा लोकांना बसत आहेत. मात्र अजून खरा उन्हाळा चालू होयचा आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र या उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक नागरिक घरामध्ये AC , Cooler अशी साधने बसवतात. ज्यापासून तुम्हाला गार वारा मिळतो आणि कडक उन्हापासून दिलासा मिळतो.
तुम्ही जर का चांगला AC खरेदी करण्याचा विचार केला तर तुमच्या मनामध्ये इन्व्हर्टर एसी आणि स्मार्ट एसी डोळ्यासमोर येतात. अलीकडे काही वर्षांमध्ये या दोन एसींना चांगली लोकप्रियता मिळाली आहे. तुम्हीही इन्व्हर्टर एसी आणि स्मार्ट एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण निर्णय घेऊ शकत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे ते आज आपण जाणून घेऊयात.
Inverter AC
इन्व्हर्टर एसी हा एक प्रकारचा AC आहे जो खोलीच्या तापमानानुसार त्यांचे कूलिंग क्षमता अड्जस्ट करण्यासाठी कंप्रेसरचा वापर करतो. याचा अर्थ एसी रेगुलर एसीप्रमाणे चालू आणि बंद करण्याऐवजी एकसारखे तापमान राखण्यासाठी वेगवेगळ्या स्पीडमध्ये चालू राहून तापमान नियंत्रणामध्ये ठेवतो.
Inverter AC चे फायदे
इन्व्हर्टर एसीचा एक मुख्य फायदा म्हणजे तो तुम्हाला विजेची बचत करण्यास आणि तुमचे वीज बिल कमी करण्यास मदत करू शकतो. किंबहुना एकसमान तापमान राखण्यासाठी त्याला तितके कष्ट करावे लागत नाहीत, त्यामुळे ते एकूणच कमी उर्जा वापरते.
Smart AC
एका स्मार्ट एसीला स्मार्टफोन App आणि व्हॉइस असिस्टंटने काही अंतरावरून देखील कंट्रोल करता येते. स्मार्ट एसी इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने तुमच्या खोलीतील तापमान अड्जस्ट करणे, तापमान शेड्यूल करणे , ऊर्जेच्या वापरावर लक्ष ठेवण्याची परवानगी देते.
Smart AC चे फायदे
स्मार्ट एसीचा मुख्य फायदा हा आहे की तुम्ही जागेवरून न उठता आणि किंवा एसीजवळ न जातादेखील याला कंट्रोल करू शकता. तुमच्या फोनवरून तुम्ही स्मार्ट एसी चालू किंवा बंद देखील करू शकता. स्मार्ट एसीमुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विजेची बचत होण्यासाठी मदत करू शकतात.
तुम्ही इन्व्हर्टर एसी किंवा स्मार्ट एसी खरेदी करायचा हे पूर्णपणे तुही कशाला प्राधान्य देत आहात त्यावर अवलंबून आहे. तुम्हाला वीजबिलात बचत करायची असल्यास तर तुमच्यासाठी इन्व्हर्टर एसी योग्य आहे. याशिवाय जर का तुमचा तुमच्या एसीला कुठूनही कंट्रोल करायचे असले तर तुम्ही स्मार्ट एसी देखील खरेदी करू शकता.