प्रजासत्ताक दिनादिवशी अनेक कंपन्यांकडून वेगवेगळ्या ऑफर देण्यात येतात. Lava कंपनीच्या Hearable Earbuds ब्रॅंडकडून देखील एक उत्तम ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर केवळ प्रजासत्ताक दिनादिवशी मर्यादित असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना Earbuds Probuds 21 फक्त २६ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा स्टॉक संपेपर्यंत ही ऑफर सुरू राहील. चला तर मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुठे खरेदी करता येईल?

रिपब्लिक डे दिवशी Probuds २१ इयरबड्स ग्राहकांना कंपनीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Lava Store वरून खरेदी करता येईल. तसंच अमेझॉनवरूनही हे इयरबड्स फक्त २६ रुपयांमध्ये खरेदी करता येतील. २६ जानेवारीला हा सेल दुपारी १२ वाजता सुरू होणार असून स्टॉक संपेपर्यंत ही ऑफर सुरू राहणार आहे. तुम्हाला हे इयरबड्स खरेदी करायचे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करावी लागेल.

Lava Probuds 21 ear buds चे भन्नाट फीचर्स

Lava Probuds 21 ear buds मध्ये ६० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये ७५ ms अल्ट्रा-लो लेटन्सीसह उत्कृष्ट गेमिंग अनुभव देखील मिळतो. या इयरबड्समध्ये १२ mm डायनॅमिक ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये IPX4 रेटिंग देण्यात आली आहे. या इयरबड्समध्ये वेक आणि पेअर फीचर देण्यात आले आहे. तसंच नॉईज आयसोलेशन फीचरही देण्यात आले आहे.

( हे ही वाचा: Netflix History डिलीट कशी करायची? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

Lava Probuds 21 ear buds ची किंमत

Lava Probuds 21 ची खरी किंमत १,२९९ रुपये आहे. तसंच याच्या खरेदीवर एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी देखील दिली जात आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी ऑफर म्हणून हे इयरबड्स तुम्हाला फक्त २६ रुपयांना खरेदी करता येतील. मात्र येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे इयरबड्स फक्त २६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता बुक करता येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day offer buy lava probuds 21 earbuds in just 26 rupees gps