scorecardresearch

Netflix History डिलीट कशी करायची? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

नेटफ्लिक्सवरून History डिलीट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स वापराव्या जाणून घ्या

Netflix History डिलीट कशी करायची? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
नेटफ्लिक्स हिस्ट्री डिलीट करण्याच्या स्टेप्स (प्रातिनिधिक फोटो)

नेटफ्लिक्स लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. यावर जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील कंटेन्ट उपलब्ध होतो. भारतीय प्रेक्षकांनीही नेटफ्लिक्सवरील कंटेन्टला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. अधिकाधिक चांगल्या विषयांवरील चित्रपट, वेब सिरीज प्रदर्शित करून नेटफ्लिक्स ओटीटी प्रेक्षकांना अधिकाधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. एखाद्या व्यक्तीने नेटफ्लिक्सचे सबस्क्रीप्शन घेतले, तर त्या सबस्क्रीप्शनवर एकापेक्षा जास्त लोक नेटफ्लिक्समध्ये लॉग इन करू शकतात. यासाठी कुटुंबातील व्यक्तींना किंवा मित्रमंडळींना पासवर्ड शेअर केला जातो. पण यामध्ये मुख्य अडचण येते ती म्हणजे आपण नेटफ्लिक्सवर काय पाहतोय हे पासवर्ड शेअर केलेल्या व्यक्तीलाही समजते.

यासाठी हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सवरील हिस्ट्री डिलीट करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा.

  • नेटफ्लिक्स अकाउंटमध्ये ब्राऊजरमधून लॉगइन करा.
  • प्रोफाइलवर क्लिककरून सेटींग्स पर्याय निवडा.
  • त्यामध्ये स्क्रोल करुन प्रोफाईल अँड पॅरेनटल कंट्रोल पर्यायावर क्लिक करा. त्यामधून तुम्हाला कोणते प्रोफाईल अपडेट करायचे आहे ते निवडा.
  • त्यातील ऍक्टिव्हिटी ऑपशन निवडा.
  • त्यामध्ये तुम्हाला जो कंटेन्ट हिस्ट्रीमधून डिलीट करायचा आहे तो निवडा.
  • त्यानंतर कन्फर्म पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही नेटफ्लिक्सवरून हिस्ट्री डिलीट करू शकता. हिस्ट्रीमधील एखादा कंटेन्ट डिलीट केल्यानंतर तो पुन्हा कंटिन्यु वॉचिंग किंवा हिस्ट्रीमध्ये दिसणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 15:32 IST

संबंधित बातम्या