ठाणे : ठाण्यातील बाळकूम भागात एका सराफाला बंदूकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु सराफाने प्रतिकार केल्याने चौघेही पळून जात होते. त्यावेळी एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकारानंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : कल्याण: मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहाड रेल्वे स्थानकात चोरी करणारी महिला अटकेत

बाळकूम येथील पाडा क्रमांक दोन परिसरात सराफाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सराफ दुकानामध्ये एकटा असताना चार जण त्यांच्या दुकानामध्ये शिरले. त्यातील एकाकडे बंदूक होती. चौघांनी बंदूकीचा धाक दाखवून सराफाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी सराफाने त्याच्याकडील एका दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर चौघे चोरटे पळून जात होते. ॉ

सराफाने आरडाओरड केला. स्थानिक रहिवाशांनी चोरट्याचा पाठलाग केला तसेच एकाला पकडले. तर एका चोरट्याने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.