कल्याण – वासिंद रेल्वे स्थानकाजवळ उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठीच्या लोखंडी सळईंमधील एक तुकडा रेल्वे मार्गात पडला होता. हा तुकडा कसाराकडे जाणाऱ्या लोकलखाली चाकांदरम्यान अडकल्याने लोखंडी तुकडा वीस मीटर रुळाला घासत गेला. यावेळी रुळाजवळ काम करत असलेला रेल्वे कामगार जखमी झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; बोटीत पाकिस्तांनी नागरिक असल्याची केवळ अफवा

हेही वाचा – कल्याणमध्ये वाहनाखाली श्वान चिरडून ठार

या लोखंडी तुकड्यामुळे अपघात होऊन प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण केल्याने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पुलाचा ठेकेदार, कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश शेवाळे (रा. शहापूर) असे तक्रारदाराचे नाव आहे. दिनेश मदनलाल कुमार (२५, रेल्वे ट्रॅकमन) हे कामगार यावेळी कसारा लोकल जात असताना त्या भागात काम करत होते. लोकलखाली लोखंडी तुकडा येताच तुकडा घासत २० मीटरपर्यंत गेला. यावेळी उडालेल्या दगडींमुळे दिनेश गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुलाच्या कामाचे ठेकेदार, तेथील कामगार यांनी योग्य खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर हयगय व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Near vasind kasara local was in threat due to iron bar ssb