Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मद्यपीच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत आहे. विशेष म्हणजे त्याला शुद्ध नाही की त्याच्या अंगावर भलामोठा अजगर बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (A big python crawled over a drunk man video goes viral on social media)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भलामोठा अजगर मद्यपीला विळखा घालून बसला (A big python crawled over a drunk man)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला मद्यपी दिसेल. तो निवांत एका ठिकाणी बसलेला आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत आहे. पण या मद्यपीने इतकी दारू प्यायली आहे की त्याला शुद्ध नाही की तो मृत्यूला कवटाळून बसलेला आहे. त्याला अजगराबरोबर बसलेले पाहून लोक जोरजोराने ओरडताना दिसत आहे. पण तरीसुद्धा त्याला कळत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. पुढे या मद्यपीबरोबर काय घडते, हे या व्हिडीओमध्ये दाखवले नाही. मीडियाच्या माहितीनुसार हा व्हिडीओ नांदयाल शहरातील आहे. नांदयाल हे आंध्र प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हेही वाचा : “गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही; VIDEO पाहून कळेल कर्माचं फळ म्हणजे नक्की काय

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दारूच्या नशेत असलेल्या एका माणसावर अजगर चढला होता तेव्हा स्थानिकांनी त्याला वाचवले.”

हेही वाचा : Maharashtrian Nath Video : महाराष्ट्रीयन नथींचे प्रकार माहितीये? पेशवाई नथपासून कारवारी नथपर्यंत; पाहा Viral Video

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “अजगरला जास्त धोका होता, चांगले आहे की माणुस चावला नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “बरं झालं लोक मदतीला धावून आली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मद्यपान आरोग्यासाठी खरंच चांगले नाही” एक युजर लिहितो, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी त्या मद्यपीची विचारपूस केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A big python crawled over a drunk man video goes viral on social media ndj