Viral video : निसर्गाचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. अनेक वेळा निसर्गाचा असा चमत्कार आपल्यासमोर येतो, जो पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. निसर्गाच्या कुशीत अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि या निसर्गात राहणारे प्राणी आणि पक्षीसुद्धा त्याहून अप्रतिम आहेत. वाळलेल्या गवताच्या काडी काडी जमवून काही पक्षी स्वतः कलाकुसर करून उन पावसाचे रक्षण करणारे घरटे बांधतात; तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका पक्षाने त्याच्या पिल्लांसाठी हिरवेगार गवत आणि पानांपासून एक सुंदर घरटे तयार केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर व्हायरल होणार हा व्हिडीओ एका पक्षाचा आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक पक्षी स्वतःसाठी आणि तिच्या पिल्लांसाठी घरटे तयार करत आहे आणि हे घरटे काड्यांपासून नाही तर पाने आणि गवतांपासून तयार केले आहे. या व्हिडीओमध्ये हा पक्षी अतिशय सुंदर पद्धतीने घर बांधताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हा पक्षी एखाद्या इंजिनिअरप्रमाणे घरट्याला आकार देताना आणि सुंदर काम करताना दिसून येत आहे. हिरवे गवत आणि काही पाने एकत्र करून पक्षाने इतके सुंदर घर बनवले, जे पाहून तुम्हीसुद्धा चकित व्हाल. गवत आणि पानांच्या मदतीने तयार केलेले हे सुंदर घरटे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

हेही वाचा…नोकरीसाठी पाठवला CV, पण झाला रिजेक्ट, तरीही कंपनीने दिलं ‘हे’ खास गिफ्ट, व्हायरल पोस्ट पाहून सर्वच थक्क

व्हिडीओ नक्की बघा :

गवत आणि पानांपासून तयार केले सुंदर घरटे :

एखादा पक्षी अंड घालतो आणि त्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिलांच्या संंगोपनासाठी किंवा विसाव्यासाठी घरटे तयार करतो आणि घरटी बांधण्यासाठी सगळ्यात आधी योग्य जागेची निवड करतो. अंडी घालण्याच्या किंवा पिल्ले जन्मण्याच्या आधीपासून पक्षी स्वतःसाठी घरटे बनवण्यासाठी मेहनत घेत असतात. तर आज या व्हिडीओतसुद्धा असेच काहीसं पहायला मिळालं आहे. एका पक्षाने पाने आणि गवत एकत्रित करून सुंदर असे घरटे बनवले आहे आणि अनोखे घरटे बनवणाऱ्या पक्षाचा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @butengebiden या ट्विटर अकाउंटवरून शेअर करून; ‘निसर्गाचा बेस्ट इंजिनिअर’ असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना पक्षाची कल्पना खूपच आवडली असून हिरव्यागार घरट्याच्या सुंदर रचनेचं विविध शब्दात कौतुक करताना दिसत आहेत. तसेच काही जण पक्षाची कलाकारी पाहून ‘ग्रीन हाऊस’, ‘खूपच सुंदर घरटे आहे’, ‘दोन बेडरूम असणारे घरटे’, ‘सर्वोत्तम आर्किटेक्चर’ अशा शब्दांत या सुंदर घरट्याचे आणि पक्षाचे वर्णन करताना कमेंटमध्ये दिसून आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bird has made a beautiful nest for the chicks out of grass and leaves asp