Viral Video : असं म्हणतात माणसाला एक तरी कला अवगत असावी. कारण कला माणसाला जगणं शिकवते. कलेपासून मिळणारा आनंद हा खूप समाधान देणारा असतो.या कलेला वयाची मर्यादा नसते उलट वयाबरोबर कलेचा उत्साह आणखी वाढत जातो. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा फोटोग्राफीचा छंद जोपासताना दिसत आहे. या वयात त्यांची फोटोग्राफीची आवड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा गळ्यात कॅमेरा घेऊन फोटो काढताना दिसत आहे. ते एका ऐतिहासिक स्थळी आल्याचे दिसत आहे आणि ते बारकाईने निरीक्षण करुन काही सुंदर क्षण आणि सुंदर गोष्टी कॅमेरामध्ये टिपत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल.
या व्हायरल व्हिडीओवर खूप सुंदर कॅप्शन लिहिलेय, “आनंदाचे उगमस्थान आपल्या अंतरंगी वसते, आपलेच छंद आपले चिरतारुण्य जपते..”
born_for_photography_30′ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”कलेला वयाची मर्यादा नसते…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपण आपले छंद जोपासले पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “सुंदर!वयाचे काही देणे घेणे नसते. आपले छंद आपण जपले पाहिजे.”
आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप प्रेरणादायी आहे”