Viral Video : सोशल मीडियावर विमानातील बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात प्रवासी भांडण, हाणामारी अश्लील कृत्य आणि काही विचित्र घटनासुद्धा करताना दिसून येत असतात आणि चर्चेचा विषय बनतात. काही दिवसांपूर्वी मातृभाषेत उद्घोषणा करताना आणि प्रवाशांना सूचना देणाऱ्या विमानचालकांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांना जागेवरून न उठण्यासाठी एक मजेशीर ऑफर देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ विमानातील आहे. विमानात सर्व प्रवासी बसले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना काही सूचना देण्यात येत आहेत आणि त्यांना जागेवरून उठू नका असे सांगण्यात येत आहे. पण, आपल्या जागेवरून उठू नका हे सांगण्यासाठी घोषणा देणारी व्यक्ती एक युक्ती लावते आणि एक मजेशीर गोष्ट करते. अनाउन्समेंट देताना व्यक्ती आधी इंग्रजी भाषेत आणि मग मराठी भाषेत संवाद साधते. घोषणा अशी आहे की, जर तुम्ही तुमच्या जागेवरून उठलात नाही तर तुम्हाला फ्लिपकार्टची एक खास ऑफर अनुभवायला मिळेल. हे ऐकून सर्व प्रवासी थोडे चकित होतात. विमानातील मजेशीर व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा… VIDEO : सेम टू सेम मिथुन चक्रवर्तीसारखा दिसतोय? व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावाल

व्हिडीओ नक्की बघा :

अनाउन्समेंटबरोबर दिली‌ खास ऑफर :

विमानातून पहिल्यांदा प्रवास करायचा म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. ती म्हणजे, ‘इंग्रजी भाषेतून संवाद साधण्याची.’ विमानतळावरील सुरक्षेपासून ते विमानात जाईपर्यंत सगळ्यांशी इंग्रजी भाषेत बोलायचं असतं याचं काही जणांना दडपण येतं. पण, इथे तर चक्क हिंदी भाषेत प्रवाशांसाठी एक खास ऑफर सांगण्यात आली आहे. जर तुम्ही तुमच्या जागेवरच बसून राहिलात तर फ्लिपकार्ट (Flipcart) बिग बिलियनच्या खास ऑफरमध्ये आयफोन १४ ची (IPhone14) किंमत तीन हजार रुपयांनी कमी होऊ शकते, अशी अनाउन्समेंट करण्यात आली आहे; जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्स (ट्विटर )@prince8bx या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून ‘आमच्या ऑफिसमध्ये अशी अनाउन्समेंट केली तर आम्ही मन लावून काम करू’, ‘अनाउन्समेंट ऐकण्यासाठी मी उद्याची फ्लाईट बुक केली आहे’, ‘विमानात बसलेले प्रवासी किती लकी आहेत’, ‘ऑफर अश्या द्या की, कोणी दुर्लक्ष नाही करू शकणार’; अशा अनेक कमेंट नेटकरी व्हिडीओ खाली करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An interesting offer has been announced for passengers not to get up from their seats in the plane asp