VIDEO: "मोदी महिमा अपरंपार आहे", फारुक अब्दुल्लांचा 'तो' व्हिडीओ शेअर करत भाजपाचा खोचक टोला | BJP MLA Atul Bhatkhalkar tweet video of Farooq Abdullah who sang and danced | Loksatta

VIDEO: “मोदी महिमा अपरंपार आहे”, फारुक अब्दुल्लांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत भाजपाचा खोचक टोला

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मोदी महिमा अपरंपार’ असा खोचक टोला लगावला आहे.

VIDEO: “मोदी महिमा अपरंपार आहे”, फारुक अब्दुल्लांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत भाजपाचा खोचक टोला
नरेंद्र मोदी, अतुल भातखळकर व फारुक अब्दुल्ला

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मोदी महिमा अपरंपार’ असा खोचक टोला लगावला आहे. या व्हिडीओत फारुक अब्दुल्ला एका कार्यक्रमात उपस्थितांसमोर ‘चलो बुलावा आया हैं, माताने बालाया हैं’ हे प्रसिद्ध गाणं म्हणताना दिसत आहेत. इतकंच नाही, तर गाणं म्हणताना त्यांनी ठेकाही धरलेला दिसतो. अतुल भातखळकर यांनी सोमवारी (३ ऑक्टोबर) हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, “फारुक अब्दुल्ला यांचे जय मातादी. मोदी महिमा अपरंपार आहे!”

हेही वाचा : ‘आम्हीही तेच म्हणत होतो, हे जाणते राजे नाहीत, हे तर….’; शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकरांचा टोला

भातखळकरांनी आत्ता हा व्हिडीओ ट्वीट केला असला, तरी हा व्हिडीओ बराच जुना आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ऑक्टोबर २०१५ हा व्हिडीओ पोस्ट केला होता. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी २०१५ मध्ये जम्मूमधील रघुनाथ बजार येथे भेट दिली होती. तेथे त्यांनी नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत वैष्णवी देवी भक्तांसमोर ‘माता का बुलावा है’ हे गाणं गात ठेका धरला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हुबेहुब माणसासारखं ऊस खातो हा क्यूट पांडा , VIRAL VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “जर उद्या…”
बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…
“कन्नड रक्षण वेदिकेला काँग्रेसची फूस”, भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले, “महाराष्ट्र काँग्रेसचे नेते…”
कुराण, इस्लामचा संदर्भ देत सुषमा अंधारेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल, म्हणाल्या “जर हिंदू असतील तर…”
“पुढील २४ तासांमध्ये हे प्रकार थांबले नाहीत तर…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन झालेल्या हल्ल्यांवरुन पवारांचा थेट इशारा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : मनसे अंतर्गत गटबाजी उफाळली; वसंत मोरेंच्या आरोपानंतर पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला: अजित पवार संतापून म्हणाले, “‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने…”
उर्वशी रौतेलाच्या घरी लगीनघाई, अभिनेत्री रंगली हळदीच्या रंगात
“तर मी…” ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकांविषयी अक्षय कुमारने दिलं होतं स्पष्टीकरण
मुंबईः उपचाराच्या निमित्ताने वृद्धाची १० लाखांची फसवणूक; तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल