Cockroach in Coffee : मालाड या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याची धक्कादायक घटना घडली होती. तसंच काही महिन्यांपूर्वी लिक्विड चॉकलेट सिरपमध्ये उंदीर आढळला होता. या घटनांची तेव्हा सोशल मीडियावर चर्चा झाली होती. आता या घटना काहीशा विसरी पडल्यानंतर मुंबईतल्या इनॉर्बिट मॉलमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रतीक रावत नावाच्या तरुणाने ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीत झुरळ ( Cockroach in Coffee ) आढळून आलं आहे. या प्रकरणी तरुणाने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि इतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला. प्रतीक रावत आणि त्याचा मित्र मालाड येथे असलेल्या इनॉर्बिट मॉल येथील कॉफी लॉन्जमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले होते. तेव्हा ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे पण वाचा- सांबारमध्ये आढळला मृत उंदीर, गुजरातमधल्या प्रसिद्ध देवी डोसा सेंटरमधला धक्कादायक प्रकार

नेमकं काय घडलं?

FIR मध्ये दिल्यानुसार प्रतीक रावत हे त्यांच्या एका मित्रासह मालाडच्या इनॉर्बिट मॉलमध्ये कॉफी प्यायला गेला होते. प्रतीक रावत एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतात. कॅफेत गेले तेव्हा यावेळी या दोघांनी कोल्ड कॉफी मागवली. कॉफीची चव घेतल्यावर त्यांना ती कडू लागली. ज्यानंतर त्यांनी वेटरला बोलवलं आणि कॉफी कडू असल्याचं सांगितलं. यानंतर वेटर त्यांचे ग्लास घेऊन गेला आणि त्यात साखर मिसळली आणि ते ग्लास घेऊन आला. कोल्ड कॉफी असल्याने दोघंही कॉफी स्ट्रॉने पित होते. जेव्हा कॉफी थोडी राहिली तेव्हा प्रदीप रावत यांना लक्षात आलं की त्यांच्या कॉफीत काहीतरी वळवळ करत आहेत. त्यांनी ग्लास नीट पाहिला तेव्हा समजलं की ते एक झुरळ ( Cockroach in Coffee ) होतं.

प्रदीप रावत यांची पोलिसात धाव

सदर घटना घडल्यानंतर प्रदीप रावत यांनी तातडीने वेटरला बोलवलं आणि रेस्तराँच्या मालकालाही बोलवून हा प्रकार ( Cockroach in Coffee ) दाखवला. यानंतर मालकाने प्रदीप रावत यांना रेस्तराँच्या किचनमध्ये नेलं. ज्या ठिकाणी इतर पदार्थ आणि कॉफी तयार केली जाते ती जागा दाखवली. इथे झुरळ येऊच शकत नाही असं कॅफेचा मालक प्रदीप रावत यांना म्हणाला. प्रदीप रावत यांनी त्यांच्या ग्लासचे फोटो काढले होते. त्यांनी या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या कोल्ड कॉफीमुळे आपल्याला अपचन, विषबाधा किंवा इतर काही त्रास झाला तर कोण जबाबदार? असा प्रश्न प्रदीप रावत यांनी विचारला. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cockroach in coffee in orbit mall cafe police complaint file by pradeep ravat scj