‘करावे तसे भरावे’, अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट करायला जातात; पण मग उलट नेहमी त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण ‘जसे कर्म, तसे फळ’, असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि मग आपल्याच बाबतीत वाईटच घडते. आता उदाहरण दाखवून देणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला; जो पाहून तुम्हीही म्हणाल, “म्हणून कधी कुणाचं वाईट करायचा विचारही करू नका.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही चोरीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतील; पण तुम्ही कधी चोराचा प्लॅन फसल्याचं आणि तोच अडचणीत आल्याचं पाहिलं आहे का? आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखविणार आहोत; जो पाहून तुम्हालाही वाटेल हे तर व्हायलाच हवं होतं. ट्विटर (पूर्वीचे एक्स) या सोशल प्लॅटफॉर्मवर सध्या चोरीचा हा व्हिडीओ दिसत आहे.

बॅग किंवा चेन हिसकावून घेतल्यानंतर चोरटे वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण, त्यानंतर अनेक वेळा त्यांना पकडले जाते, तर कधी त्यांना बेदम मारहाण केली जाते. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये एक व्यक्ती महिलेची पर्स हिसकावून पळून जात असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान त्याला अशी शिक्षा मिळाली की, चुकीचे काम करणारेही हे पाहून दोनदा विचार करतील. पण, नेमकं घडलं काय ते आपण जाणून घेऊ…

(हे ही वाचा : कंगाल पाकिस्तानात रेल्वेतून उतरण्याची ही कोणती पद्धत? VIDEO आला समोर, नेटकरी म्हणाले, “भौतिकशास्त्र शिकले असते तर…”)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चोर एका महिलेची पर्स आणि फोन हिसकावून पळून जाताना दिसत आहे. मात्र, काही वेळातच या चोराबरोबर असं काही घडतं की, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती चोरी करून पळत आहे. परंतु, रस्ता ओलांडण्यासाठी चोर पुढे गेला असता, क्षणातच एका बाजूने भरधाव कार येत असते. चोराला वस्तू मिळण्याचा इतका आनंद असतो की, तो आनंदाच्या भरात भरधाव येणारी कारही पाहत नाही. दरम्यान, ती भरधाव कार येऊन, त्या व्यक्तीला धडकते. ती धडक इतकी जोरदार होती की, तो लांबवर पडला; पण त्या कारचा वेग इतका जास्त होता की, त्यावर तो नियंत्रण ठेवू शकला नाही आणि पुन्हा कारने त्या व्यक्तीला चिरडले.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, याची माहिती उपलब्ध नाही. या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous car accident while man running watching mobile and purse video viral on social media pdb