इंटरनेटच्या दुनियेत आपल्या विचित्र गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकांच्या यादीत ढिंचक पूजाचे नाव देखील सामील आहे. बिग बॉस ११ ची माजी स्पर्धक असलेली ढिंच्याक पूजा काही वर्षांपूर्वी ‘सेल्फी मैं लेली आज’ या गाण्यामुळे व्हायरल झाली होती, जी आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे. यावेळी पूजाने तिच्या नवीन गाण्यासोबत पुन्हा एन्ट्री केली आहे. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतेच ढिंच्याक पूजाचे नवीन गाणे ‘एक और सेल्फी लेने दो’ ८ मे रोजी यूट्यूबवर रिलीज झाले आहे. हे गाणे लोकांच्या अपेक्षेप्रमाणेच आहे. व्हिडीओमध्ये पूजा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती कधी आयफेल टॉवरसमोर तर कधी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसमोर फोटो काढताना दिसत आहे. या गाण्यात पुढे तुम्हाला ‘रात के बज गए एक या दो, एक और सेल्फी लेने दो. बाकी सब को सोने दो, मुझे सेल्फी लेने दो. आयफिल टावर के सामने, ताजमहल के पास. बुर्ज खलीफा के नीचे, स्टैच्यू ऑफ लिबर्टी के साथ’, असे बोल ऐकू येतील.

Viral Video : …अन् बघता बघता समुद्रात वाहून गेले ३ कोटींचे घर; पाहा निसर्गाचे रौद्र रूप

पूजाच्या ‘एक और सेल्फी लेने दो’ या नवीन गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. ढिंचक पूजाचे हे गाणे आधीच्या गाण्यासारखे व्हायरल झाले नसले तरीही सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी पूजाने ‘सेल्फी मैं ले ली’, ‘स्वॅग वाली टोपी’ आणि ‘दिल का शूटर’ सारखी इतर गाणी गायली आहेत आणि ती सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhinchak pooja new song released got so many views right away pvp