जगभरात अशा काही अजब-गजब अन् विचित्र गोष्टी आहेत किंवा घडत आहेत की, ज्या लोकांना खूप आश्चर्यचकित करतात. त्यापैकी काही गोष्टी अशा आहेत की, ज्या काही निसर्गाने तयार केल्या आहेत; तर काही मानवनिर्मित आहेत. पण, या गोष्टी कशा निर्माण झाल्या किंवा कशा घडल्या याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. अशाच प्रकारे चीनमधून एक अजब-गजब आणि अनोखी गोष्ट समोर आली आहे; ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या चीन इंजिनियरिंग क्षेत्रात एवढी प्रगती करीत आहे की, हा देश आता अमेरिका आणि युरोपशी स्पर्धा करीत आहे. त्यात चीनने रेल्वे क्षेत्रातही एक जबरदस्त प्रगती केली आहे. चीनमधील जबरदस्त रेल्वे व्यवस्था पाहून तुमचेही डोळे चक्रावतील.

बघता, बघता थेट उंच इमारतीत शिरली मेट्रो ट्रेन

रेल्वे टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने चीनने असा एक मेट्रो प्लॅटफॉर्म तयार केला आहे की, जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मेट्रो ट्रेन भरधाव वेगाने येत बघता बघता थेट १९ मजली रहिवासी इमारतीमधून जात असल्याचे दिसते; जी पाहून सोशल मीडियावरील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. पाहताना असे वाटते की, मेट्रो जाऊन थेट इमारतीला आदळतेय की काय; पण प्रत्यक्षात तसे काही होत नाही. कारण या इमारतीमध्ये एक मेट्रो स्ठानक तयार करण्यात आले आहे; तर इमारतीच्या वरच्या मजल्यांवर लोकांना राहण्यासाठी अपार्टमेंट्स आहेत. त्यामुळे हे इमारतवजा मेट्रो स्टेशन (चीन चोंगकिंग ट्रेन) बनले आहे.

हा व्हिडीओ @sachkadwahai या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक अनोखी मेट्रो ट्रेन दिसत आहे, जी इमारतीमधून जात आहे. खाली उभे असलेले शेकडो लोक हे दृश्य पाहत असून, त्याचा व्हिडीओ शूट करीत असल्याचे दिसत आहे. यावेळी बघता बघता संपूर्ण मेट्रोच इमारतीमध्ये प्रवेश करते. चीनमधील लोकांसाठीदेखील हे अनोखे मेट्रो रेल्वे स्टेशन एक कुतूहलाचा विषय ठरले आहे. त्यामुळे अनेक लोक हे मेट्रो स्टेशन पाहण्यासाठी गर्दी करतात.

हे अनोखे मेट्रो स्टेशन चीनच्या चोंगकिंग शहरात आहे; ज्याला पर्वतांचे शहर, असेही म्हटले जाते. कारण- येथे पर्वतांसारख्या उंच इमारती आहेत. हा रेल्वेमार्ग २००४ मध्ये सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रेन लाईट रेल्वेच्या श्रेणीत येतात, असे सांगितले जात आहे. इमारतीमधील ही मेट्रो सेवा इतकी शांत आहे की, इमारतीत राहणाऱ्या लोकांना याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे; तर अनेकांनी चीनच्या या टेक्नॉलॉजीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know this train passes through a middle of a 19 storey residential building in china video goes viral sjr