Premium

डॉक्टरांचे कौतुक करावे तितके कमी, मजा-मस्तीमध्ये टोचले इंजेक्शन; चिमुकल्याला कळलेसुद्धा नाही, व्हिडीओ एकदा पाहाच

आज आम्ही तुम्हाला एका अशा डॉक्टरांविषयी सांगणार आहोत जे लहान मुलांबरोबर मजा-मस्ती करत इंजेक्शन टोचतात आणि त्यांना कळतसुद्धा नाही. हो, या डॉक्टरांचे कौतुक करावे तितके कमी आहे.

Doctor distracts child while giving injection
डॉक्टरांचे कौतुक करावे तितके कमी, मजा-मस्तीमध्ये टोचले इंजेक्शन; चिमुकल्याला कळलेसुद्धा नाही, व्हिडीओ एकदा पाहाच (Photo : Instagram)

Video : डॉक्टर हा समाजातील असा घटक आहे, जो नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. इंजेक्शनच्या भीतीमुळे अनेकदा लहान मुले डॉक्टरकडे जायला घाबरतात. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा डॉक्टरांविषयी सांगणार आहोत जे लहान मुलांबरोबर मजा-मस्ती करत इंजेक्शन टोचतात आणि त्यांना कळतसुद्धा नाही. हो, या डॉक्टरांचे कौतुक करावे तितके कमी आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते लहान मुलाला त्याच्या नकळत इंजेक्शन टोचताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ डॉक्टरांच्या केबिनमधील आहे. त्यांच्या केबिनमध्ये दोन चिमुकले त्यांच्या समोर असलेल्या टेबलावर बसलेले दिसत आहेत आणि डॉक्टरांनी त्यांच्या केबिनमध्ये मीठू मीठू हे गाणं लावलं आहे. डॉक्टरसुद्धा हे गीत गात या चिमुकल्यांबरोबर खेळताना दिसत आहेत.
खेळता खेळता आणि मजा-मस्ती करताना डॉक्टर हळूच त्यातील एका चिमुकल्याला इंजेक्शन टोचतात आणि हा चिमुकला खेळण्यात इतका दंग असतो की त्याला कळतसुद्धा नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या डॉक्टरांचे चाहते व्हाल.

हेही वाचा : VIDEO : जेव्हा मराठमोळ्या आजीला नात हिंदी गाणं शिकवायला जाते…; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही…

डॉक्टरांनी drimranpatelofficial त्यांच्या या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर युजर्सनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. डॉ. इमरान पटेल असे या डॉक्टरांचे नाव आहे. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी आधीही असे अनेक लहान मुलांबरोबरचे व्हिडीओ शेअर केलेले आहेत.

त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओतून दिसून येते की, या डॉक्टरांना त्यांचा जॉब खूप आवडतो”; तर एका युजरने लिहिलेय, “डॉक्टर असावे तर असे…” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच खूप छान डॉक्टर आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Doctor distracts child while giving injection in amazing and fuuny way video goes viral ndj

First published on: 21-09-2023 at 18:25 IST
Next Story
जिद्दीला सलाम! दिवसभर फार्मा कंपनीमध्ये करते जॉब, ऑफिस सुटताच विकते पास्ता, ‘या’ तरुणीची प्रेरणादायी कथा एकदा वाचा